HomeExam. Time Tables (KBC NMU Jalgaon)दि. 14/06/2022 पासून सुरू होणार्‍या परीक्षांसदर्भात अतिमहत्त्वाची माहिती

दि. 14/06/2022 पासून सुरू होणार्‍या परीक्षांसदर्भात अतिमहत्त्वाची माहिती

 

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

  दि. 14/06/2022 पासून कवयित्री  बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठाच्या सर्व शाखांच्या परीक्षा सुरू होत आहेत. खूप दिवसांनी ऑफलाईन मोडमध्ये तसेच प्रथमतःच बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात परीक्षा होणार असल्याने बर्‍याच विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार नवीन आहे. म्हणून विद्यार्थ्यांना  परीक्षेत उत्तरे लिहितांना अडचणी येऊ नयेत म्हणून पुढील सूचनांचे पालन करावे.

√  परिक्षेसाठी नियमित वापरली जाणारी रेघीय उत्तर पत्रिका नसून OMR Sheet असणार आहे.

√ सदर OMR Sheet एकदाच मिळणार आहे. तिच्यावर काही खाडाखोड किंवा चूका झाल्यास दुसरी OMR Sheet मिळणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी तिच्यावरील सर्व माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी.

√ विद्यार्थ्यांनी OMR Sheet वर पुढीलप्रमाणे 7 प्रकारची माहिती अतिशय काळजीपूर्वक भरायची आहे.  

1. Centre Code  

2. Name of Exam.  

3. Subject Name  

4. Subject Code  

5. Date and Time of Exam  

6. Seat Number   

7. Candidate’s Signature

√ Centre Code व Seat Number चौकटीत भरल्यानंतर त्याखालील सर्कल नंबर नुसार डार्क करावेत.

√ छोट्या कॉलममध्ये प्रश्न क्रमांक असून त्यासमोरील मोठ्या कॉलममध्ये A, B, C, D नुसार सर्कल आहेत. योग्य उत्तराचे सर्कल डार्क करावेत.

√ सर्कल पूर्ण डार्क करावे. तसेच, एका उत्तरासाठी एकच सर्कल डार्क करावे, दोन करू नयेत. 

√ या परीक्षेत प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे पुरविली जाईल.

√ परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिका तसेच प्रश्नपत्रिका सुद्धा पर्यवेक्षकाकडे (Jr. Supervisor) जमा करायच्या आहेत.

विद्यार्थ्यांनी OMR Sheet मध्ये कुठे काय भरावे हे पुढील OMR Sheet मध्ये दाखवलं आहे.




RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments