to a great extent – मोठ्या प्रमाणात.
iv) He impressed the audience to a great extent.
त्याने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केले.
Pros and cons- साधक- बाधक
Examples:
i) They discussed pros and ons of the issue.
त्यांनी विषयावर साधक बाधक चर्चा केली.
ii) After discussing pros and cons of Lokpal Bill, it was passed in the Parliament.
लोकपाल बिलावर साधक बाधक चर्चा केल्यावर ते संसदेत पारित करण्यात आले.
iii) The students discussed pros and cons of democracy.
विद्यार्थ्यांनी लोकशाहीवर साधक – बाधक चर्चा केली.
iv) Please, don’t discuss pros and cons of politics.
कृपया, राजकारणावर साधक – बाधक चर्चा करू नका.
to get fed up with- चा कंटाळा येणे
Examples:
i) I have got fed up with his gossips.
त्याच्या गप्पांचा मला कंटाळा आला आहे.
ii) They got fed up with study.
त्यांना अभ्यासाचा कंटाळा आला.
iii) Raju is fed up with playing.
राजुला खेळण्याचा कंटाळा आला आहे.
iv) He got fed up with loneliness.
त्याला एकटेपणाचा कंटाळा आला.
to get habitual with-ची सवय होणे
Examples:
i) You should get habitual with study.
तुम्ही आभ्यासाची सवय केली पाहिजे.
ii) He is habitual with practising Yoga.
त्याला योगासन करण्याची सवय आहे.
iii) Shyam was habitual with playing chase.
श्यामला बुद्धिबळ खेळण्याची सवय आहे.
iii) Shamli is habitual with singing.
शामलीला गायनाची सवय आहे.
to get acquainted with – शी परिचित होणे.
Examples:
i) He got acquainted with the exam system.
त्याचा परीक्षा पद्धतीशी परिचय झाला.
ii) Citizens have got acquainted with such problems.
नागरिकांचा अशा समस्यांशी परिचय झाला.
iii) I want to get acquainted with your friend.
मला तुझ्या मित्रांशी परिचय करून घ्यायचा आहे.
iv) Rakesh will get acquainted with Mohit.
राकेश मोहितशी परिचय करून घेईल.
to be fond of – ची आवड असणे.
Examples:
i) She is fond of reading.
तिला वाचनाची आवड आहे.
ii) Mangesh is fond of playing.
मंगेशला खेळण्याची आवड आहे.
iii) Rahul was fond of music.
राहुलला संगीताची आवड होती.
iv) They were fond of swimming.
त्यांना पोहण्याची आवड होती.
on and off : अधून मधून
(also used as ‘off and on’ meaning intermittently)
Examples:
i) His friend comes to see hem on and off.
त्याचाा मित्र त्याला अधून मधून भेटायला येतो.
ii) They help me off and on.
ते मला अधून मधून मदत करतात.
iii) Roshni studies on and off.
रोशनी अधून मधून अभ्यास करते.
iv) He comes to college on and off.
तो अधून मधून महाविद्यालयात येतो.
a lot of : खूप /पुष्कळ
Examples:
i) There are a lot of flowers in the garden.
बागेत खूप फुले आहेत.
ii) There were a lot people on the ground.
मैदानावर पुष्कळ लोकं होते.
iii) There are a lot of mistakes in his writing.
त्याच्या लेखनात पुष्कळ चुका आहेत.
iv) There are a lot of books in the library.
ग्रंथालयात खूप पुस्तके आहेत.
a piece of cake: अतिशय सोपं काम.
Examples:
i) This work is a piece of cake for you.
हे काम तुझ्यासाठी अतिशय सोपं आहे.
ii) The test was a piece of cake for the students.
विद्यार्थ्यांसाठी चाचणी अतिशय सोपी होती.
iii) Winning the match is a piece of cake for India.
मॅच जिंकणे भारतासाठी अतिशय सोपे आहे.
iv) EngEduTech made English learning a piece of cake.
इंगएज्युटेकने इंग्रजी शिकणे अतिशय सोपे केले.